२०१२०४१५

तुतीची फळे



आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीतच असते की रेशीम निर्माण करणारे किडे एका विशिष्ट झाडावरचा वाढत असतात. त्या झाडाचे नाव आहे तुती. ७० फुटांपर्यंत उंच वाढणारे हे झाड दीर्घायू असून शेकडो वर्षे जगू शकते. मात्र ह्या झाडाची फळे, साबुदाण्याच्या आकाराच्या काळसर फळांच्या लोंगरांच्या स्वरूपात वाढतात. चवीलाही आंबट-गोड आणि चवदार लागतात. तुतीतील फायटोस्टिरॉल रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित केला जातो. तुतीमुळे हृदयाच्या स्नायूपेशींचा कमकुवतपणा घटतो. तसेच रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. रक्तवाहिन्याचा आकार नियंत्रित राहतो. तुतीमधील गुणधर्मांमुळे तारुण्य टिकून राहण्यास मदत होते.

तुती झाडांचा उपयोग रेशीमकीटक संगोपनाशिवाय तुती चहा, कोंबडी खाद्य, जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी केला जातो.

पांचगणी आणि महाबळेश्वर यांचे दरम्यान मॅप्रोची एक बाग आणि स्ट्रॉबेरी जॅम, जेली व सिरप यांच्या निर्मितीचा एक मोठा प्रकल्प आहे. ईस्टरच्या सप्ताहांती दरसाल इथे एक स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित केला जात असतो. त्या सुरस महोत्सवात प्रस्तुत झालेल्या फळांची ही काही प्रकाशचित्रे आहेत. त्यात तुतीची फळेही समाविष्ट आहेत.



त्यातीलच ह्या रास्पबेरी

मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर "मोदक" ह्या नावाने वावरणार्‍या श्री.मनोज शेडबाळकर ह्यांच्या स्ट्रॉबेरी फेस्टीवल-२०१२ ह्या लेखातून ही प्रकाशचित्रे घेतलेली आहेत. इथे पुन्हा प्रकाशन करण्यास अनुमती दिल्याखातर श्री.मनोज ह्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. मूळ लेखात अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रे आणि त्या उत्सवातील खाद्यपदार्थांची रसभरीत वर्णने आहेत. म्हणून तो लेख मुळातच वाचणीय आहे.



आणि ह्या स्ट्रॉबेरीज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: